बारामती, 17 ऑक्टोबरः बारामती येथील तुळजाराम चतुरचंद कला वाणिज्य आणि विज्ञान स्वायत्त महाविद्यालयाचा उद्योजकता विकास मंच आणि विद्यार्थी परिषदेच्या वतीने युवा संवाद हा कार्यक्रम नुकताच आयोजित करण्यात आला होता. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून आमदार रोहित पवार यांनी उपस्थिती दर्शविली.
पुण्यातील महिला वाहतुक पोलिसाचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आमदार रोहित पवार यांनी स्पर्धा परीक्षांचे तरुणांसमोर आवाहन तसेच नवउद्योजक म्हणून असणाऱ्या संधी आणि नव उद्योजकांची नवीन उद्योग चालू करण्याची असणारी मानसिकता यावर त्यांनी मार्गदर्शन केले.
उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात क्रांती होत आहे. त्याचबरोबर त्याचे आधुनिकीकरण होते आहे. त्यामुळे या क्षेत्रातील संधी ओळवून प्रत्येक विद्यार्थ्याने आपले करियर करावे. व्यवसाय चालू करण्यापूर्वी कष्ट करण्याची आपली सकारात्मक मानसिकता ठेवावी, असे चर्चात्मक विश्लेषण केले.
पोलीस कारवाईत तब्बल 54 लाखांचा गांजा जप्त
दरम्यान, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी आमदार रोहित पवार यांचा सत्कार केला. यावेळी महाविद्यालयाचे विद्यार्थी संख्येने उपस्थित होते.
One Comment on “तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात रोहित पवारांची हजेरी”