जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील, नरेंद्र मोदींचे विधान

उधमपुर, 12 एप्रिल: (विश्वजीत खाटमोडे) येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू-काश्मीर येथील उधमपुर याठिकाणी जाहीर सभा घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होतील आणि जम्मू-काश्मीरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळेल, असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. आत्तापर्यंत जे झालं तो फक्त ट्रेलरच होता, मला आता नवीन जम्मू-काश्मीरचे नवीन आणि अद्भुत चित्र तयार करण्यात व्यस्त व्हायचे आहे, असे नरेंद्र मोदींनी या सभेत बोलताना म्हटले आहे. मोदी विकसित भारतासाठी जम्मू-काश्मीरच्या विकासाची गॅरंटी देत आहे, पण काँग्रेस, नॅशनल कॉन्फ्रेंस आणि पीडीपी हे जम्मू-काश्मीरला पुन्हा जुन्या काळात घेऊन जाऊ इच्छित आहेत, अशी टीका नरेंद्र मोदी यांनी यावेळी विरोधी पक्षांवर केली.

https://x.com/ANI/status/1778666654555324820

https://twitter.com/ANI/status/1778663483317600751?s=19

https://twitter.com/ANI/status/1778664941735784779?s=19

कलम 370 ची भिंत पाडली

“सत्तेसाठी आधीच्या सरकारांनी जम्मू-काश्मीरमध्ये भिंत 370 बांधली होती. इथल्या नेत्यांनी लोकांमध्ये भीती निर्माण केली होती. पण मोदींनी कलम 370 ची भिंत पाडली आहे. हे लोक म्हणायचे की, 370 हटवली तर आग लागेल, जम्मू-काश्मीर आम्हाला सोडून जाईल, पण जम्मू-काश्मीरच्या जनतेने त्यांना आरसा दाखवून त्यांची वास्तविकता सांगितली. हेच लोक आता जम्मू-काश्मीरच्या बाहेर देशातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचे काम करत आहेत,” असे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

https://twitter.com/ANI/status/1778661208373231847?s=19

तुमचे स्वप्न हे माझा संकल्प

मी तुम्हाला मागे एकदा सांगितले होते की, माझ्यावर विश्वास ठेवा, मी 60 वर्षांचा प्रश्न सोडवणार आहे. तेव्हा मी इथल्या माता-भगिनींच्या इज्जतीची हमी दिली होती. गरिबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता करावी लागणार नाही याची हमी दिली होती. आज जम्मू-काश्मीरमधील लाखो कुटुंबांना पुढील पाच वर्षांसाठी मोफत रेशनची हमी दिली असल्याचे नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. जम्मू-काश्मीर आता पर्यटनासोबतच स्टार्टअपसाठी ओळखले जाणार आहे. जम्मू असो की काश्मीर, आता येथे विक्रमी संख्येने पर्यटक आणि भाविक येऊ लागले आहेत. हे स्वप्न इथल्या अनेक पिढ्यांनी पाहिले आहे. मी तुम्हाला गॅरंटी देतो की, तुमचे स्वप्न हे मोदीचा संकल्प आहे. 10 वर्षांत जम्मू-काश्मीर पूर्णपणे बदलले आहे. रस्ते, वीज, पाणी, प्रवास, स्थलांतर हे सर्व आहेच. पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जम्मू-काश्मीरचे मन बदलले आहे. जनता आता निराशेतून आशेकडे वळली आहे, असे नरेंद्र मोदी यांनी या सभेत म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *