विधानसभा निवडणूक; अनेक सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला

मुंबई, 20 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात आज (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. त्यानुसार या मतदानाला सकाळपासून सुरूवात झाली आहे. विधानसभेच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती आमनेसामने आहेत. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरूवात झाली. त्यानंतर सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे पहिल्या दोन तासांत संपूर्ण राज्यात 6.61 टक्के मतदारांनी मतदान केले असल्याची माहिती राज्याच्या निवडणूक आयोगाने दिली आहे. तर येत्या काही तासांत मतदानाची टक्केवारी झपाट्याने वाढेल, असा अंदाज सध्या वर्तविण्यात येत आहे.

https://x.com/ANI/status/1859065011538456841?t=hARc3lcOD6S696yNmpAbAw&s=19

https://x.com/ANI/status/1859070451395301815?t=u_XkG9Z7TIPeGW4XLdkpKg&s=19

या सेलिब्रिटींनी मतदानाचा हक्क बजावला

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी अनेक बड्या नेत्यांनी तसेच सेलिब्रिटींनी सकाळीच मतदान केंद्रांवर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील नागरिकांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले आहे. यावेळी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार, राजकुमार राव, अली फजल, फरहान अख्तर यांनी मुंबईतील मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले. तसेच भारताचा माजी क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडूलकर यांनीही सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच अभिनेता रितेश देशमुखने देखील त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलिया देशमुख सह मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर मराठी चित्रपसृष्टीतील अभिनेता सुबोध भावे, प्रशांत दामले, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता माळी, हेमंत ढोमे, सायली संजीव यांनी देखील आज सकाळीच मतदान केंद्रांवर जाऊन मतदान केले आहे.

राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांनी मतदान केले

यासोबतच राजकीय नेत्यांमध्ये अजित पवार, शरद पवार, नितिन गडकरी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार, रक्षा खडसे, दिलीप वळसे पाटील, मुरलीधर मोहोळ यांसारख्या नेत्यांसह आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनीही आज सकाळीच मतदानाचा हक्क बजावला. त्याचबरोबर महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी आज राज्याच्या विधानसभा निवडणुकीसाठी राजभवन भवन क्लब मतदान केंद्रामध्ये जाऊन मतदानाचा हक्क बजावला. तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी मतदानाचा अधिकार बजावला. याशिवाय राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *