विधानसभा निवडणूक 2024; पुणे जिल्ह्यातील मतदारांची संख्या किती?

पुणे, 18 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. पुणे जिल्ह्यात यंदाची विधानसभा निवडणूक सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. पुणे जिल्ह्यात एकूण 21 मतदारसंघ आहेत. पुणे जिल्ह्यात 15 ऑक्टोंबरपर्यंत एकूण 87 लाख 57 हजार 426  lमतदार आहेत. यामध्ये 45 लाख 37 हजार 692 पुरूष मतदार, 42 लाख 18 हजार 940 महिला मतदार आणि 794 तृतीयपंथी मतदार आहेत. अशी माहिती पुणे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात किती मतदार आहेत? याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत.

https://x.com/Info_Pune/status/1846795412595757527?t=FXDlMZaXubPgDLzW6z5VCQ&s=19

पुणे जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार संख्या (15 ऑक्टोंबरपर्यंत)

1) जुन्नर मतदारसंघात एकूण 3 लाख 23 हजार 922 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 64 हजार 594 पुरूष, 1 लाख 59 हजार 322 महिला मतदार आणि 6 तृतीयपंथी मतदार आहेत.
2) आंबेगाव मतदारसंघात एकूण 3 लाख 12 हजार 311 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 58 हजार 653 पुरूष, 1 लाख 53 हजार 648 महिला मतदार आणि 10 तृतीयपंथी मतदार आहेत.
3) खेड आळंदी मतदारसंघात एकूण 3 लाख 73 हजार 552 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 92 हजार 307 पुरूष मतदार, 1 लाख 81 हजार 233 महिला मतदार आणि 12 तृतीयपंथी मतदार आहेत.
4) शिरूर मतदारसंघात एकूण 4 लाख 59 हजार 640 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 38 हजार 874 पुरूष मतदार, 2 लाख 20 हजार 743 महिला मतदार आणि 23 तृतीयपंथी मतदार आहेत.
5) दौंड मतदारसंघात एकूण 3 लाख 15 हजार 367 मतदार आहेत. यामध्ये 1 हजार 61 हजार 952 पुरूष मतदार, 1 लाख 53 हजार 404 महिला मतदार आणि 11 तृतीयपंथी मतदार आहेत.



6) इंदापूर मतदारसंघात एकूण 3 लाख 36 हजार 643 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 72 हजार 815 पुरूष मतदार, 1 लाख 63 हजार 813 महिला मतदार आणि 15 तृतीयपंथी मतदार आहेत.
7) बारामती मतदारसंघात एकूण 3 लाख 77 हजार 757 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 91 हजार 740 पुरूष मतदार, 1 लाख 85 हजार 995 महिला मतदार आणि 22 तृतीयपंथी मतदार आहेत.
8) पुरंदर मतदारसंघात एकूण 4 लाख 58 हजार 842 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 38 हजार 271 पुरूष मतदार, 2 लाख 20 हजार 539 महिला मतदार आणि 32 तृतीयपंथी मतदार आहेत.
9) भोर मतदारसंघात एकूण 4 लाख 26 हजार 707 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 25 हजार 688 पुरूष मतदार, 2 लाख 01 हजार 012 महिला मतदार आणि 7 तृतीयपंथी मतदार आहेत.

10) मावळ मतदारसंघात एकूण 3 हजार 83 हजार 328 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 96 हजार 188 पुरूष मतदार, 1 लाख 87 हजार 127 महिला मतदार आणि 13 तृतीयपंथी मतदार आहेत.
11) चिंचवड मतदारसंघात एकूण 6 लाख 55 हजार 106 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 44 हजार 599 पुरूष मतदार, 3 लाख 10 हजार 450 महिला मतदार आणि 57 तृतीयपंथी मतदार आहेत.
12) पिंपरी मतदारसंघात एकूण 3 लाख 87 हजार 868 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 02 हजार 478 पुरूष मतदार, 1 लाख 85 हजार 356 महिला मतदार आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत.
13) भोसरी मतदारसंघात एकूण 6 लाख 848 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 24 हजार 699 पुरूष मतदार, 2 लाख 76 हजार 052 महिला मतदार आणि 97 तृतीयपंथी मतदार आहेत.
14) वडगाव शेरी मतदारसंघात एकूण 4 लाख 97 हजार 116 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 56 हजार 429 पुरूष मतदार, 2 लाख 40 हजार 585 महिला मतदार आणि 102 तृतीयपंथी मतदार आहेत.
15) शिवाजीनगर मतदारसंघात एकूण 2 लाख 91 हजार 006 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 46 हजार 635 पुरूष मतदार, 1 लाख 44 हजार 325 महिला मतदार आणि 46 तृतीयपंथी मतदार आहेत.
16) कोथरूड मतदारसंघात एकूण 4 लाख 36 हजार 472 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 27 हजार 047 पुरूष मतदार, 2 लाख 09 हजार 403 महिला मतदार आणि 22 तृतीयपंथी मतदार आहेत.
17) खडकवासला मतदारसंघात एकूण 5 लाख 66 हजार 504 मतदार आहेत. यामध्ये 2 लाख 99 हजार 083 पुरूष मतदार, 2 लाख 67 हजार 380 महिला मतदार आणि 41 तृतीयपंथी मतदार आहेत.
18) पर्वती मतदारसंघात एकूण 3 लाख 58 हजार 900 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 82 जाणार 307 पुरूष मतदार, 1 लाख 76 हजार 497 महिला मतदार आणि 96 तृतीयपंथी मतदार आहेत.
19) हडपसर मतदारसंघात एकूण 6 लाख 19 हजार 694 मतदार आहेत. यामध्ये 3 लाख 25 हजार 389 पुरूष मतदार, 2 लाख 94 हजार 228 महिला मतदार आणि 77 तृतीयपंथी मतदार आहेत.
20) पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघात एकूण 2 लाख 93 हजार 146 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 48 हजार 425 पुरूष मतदार, 1 लाख 44 हजार 687 महिला मतदार आणि 34 तृतीयपंथी मतदार आहेत.
21) कसबा पेठ मतदारसंघात एकूण 2 लाख 82 हजार 697 मतदार आहेत. यामध्ये 1 लाख 39 हजार 519 पुरूष मतदार, 1 लाख 43 हजार 141 महिला मतदार आणि 37 तृतीयपंथी मतदार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *