बारामती, 21 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) वंचित बहुजन आघाडी पक्षाचे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची आणखी एक यादी आज (दि.21) प्रसिद्ध केली आहे. वंचित बहुजन आघाडीची ही पाचवी यादी आहे. या उमेदवारांच्या यादीत 16 नावांचा समावेश आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीने बारामती मतदारसंघातून मंगलदास तुकाराम निकाळजे यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत 83 उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1848327924409045031?t=_s2x8OcW8Yeyeb6fRQg5hA&s=19
वंचित बहुजन आघाडीची पाचवी यादी
1) जगन देवराम सोनवणे – भुसावळ
2) डॉ. ऋतुजा चव्हाण – मेहकर
3) सुगत वाघमारे – मूर्तिजापूर
4) प्रशांत सुधीर गोळे – रिसोड
5) लोभसिंग गणपतराव राठोड – ओवळा माजिवडा
6) विक्रांत दयानंद चिकणे – ऐरोली
7) परमेश्वर रणशुर – जोगेश्वरी पूर्व
8) राजेंद्र तानाजी ससाणे – दिंडोशी
9) अजय आत्माराम रोकडे – मालाड
10) ॲड. संजीवकुमार कलकोरी – अंधेरी पूर्व
11) सागर रमेश गवई – घाटकोपर पश्चिम
12) सुनिता गायकवाड – घाटकोपर पूर्व
13) आनंद भीमराव जाधव – चेंबूर
14) मंगलदास तुकाराम निकाळजे – बारामती
15) अण्णासाहेब शेलार – श्रीगोंदा
16) प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे – उदगीर