मुंबई, 17 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडी पक्षाने त्यांच्या उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीत 30 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याआधी वंचित बहुजन आघाडी पक्षाने उमेदवारांच्या दोन याद्या प्रसिद्ध केल्या होत्या यामध्ये एकूण 21 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची एकूण संख्या आता 51 झाली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1846576380709888359?t=2hx4bxHRZ4RsbJy0MXCiCQ&s=19
पहा उमेदवारांची नावे
दरम्यान, वंचित बहुजन आघाडीने 30 उमेदवारांची नवी यादी प्रसिद्ध केली आहे. यामध्ये धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून जितेंद्र शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. तसेच सिंदखेडा येथून भोजासिंग तोडरसिंग रावल, उमरेड मधून सपना राजेंद्र मेश्राम, बल्लारपूर येथून सतीश मुरलीधर मालेकर, चिमूर मधून अरविंद आत्माराम सांदेकर, किनवट मधून प्रा. विजय खुपसे, नांदेड उत्तर मतदारसंघातून प्रा. डॉ. गौतम दुथडे, देगलूर मधून सुशील कुमार देगलूरकर, पाथरी येथून विठ्ठल तळेकर, परतूर-आष्टी मतदारसंघातून रामप्रसाद थोरात, घनसावंगी येथून कावेरी बळीराम खटके, जालनातून डेव्हीड घुमारे, बदनापूर मधून सतीश खरात, देवळाली मधून अविनाश शिंदे, इगतपुरी मधून भाऊराव काशिनाथ डगळे, उल्हासनगर मधून डॉ. संजय गुप्ता, अनुशक्ती नगर येथून सतीश राजगुरू, वरळी मतदारसंघातून अमोल आनंद निकाळजे, पेण मधून देवेंद्र कोळी, आंबेगाव मधून दीपक पंचमुख, संगमनेर मतदारसंघातून अझिज अब्दुल व्होरा, राहुरी मध्ये अनिल भिकाजी जाधव, माजलगाव येथे शेख मंजूर चांद, लातूर शहर मतदारसंघातून विनोद खटके, तुळजापूर मधून डॉ. स्नेहा सोनकाटे, उस्मानाबाद मधून ॲड. प्रणित शामराव डिकले, परंडा मतदारसंघातून प्रवीण रणबागुल, अक्कलकोट येथून संतोष कुमार खंडू इंगळे, माळशिरस मध्ये राज यशवंत कुमार आणि मिरज विधानसभा मतदारसंघातून विज्ञान प्रकाश माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
https://x.com/VBAforIndia/status/1843917478784839740?t=20NhDJo7kupd1Uq0yhsTNw&s=19
दुसऱ्या यादीत कोणाला संधी?
तत्पूर्वी, वंचित बहुजन आघाडी पक्षाने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी 10 उमेदवारांची दुसरी यादी बुधवारी (दि.09) प्रसिद्ध केली होती. यामध्ये मलकापूर विधानसभा मतदारसंघात शहजाद खान सलीम खान, बाळापूर येथून खातीब सयद नातीक्वाद्दीन, परभणी मधून सयद सामी सय साहेबजान, औरंगाबाद मध्य येथून मोहम्मद जावीद मोहम्मद इसाक, गंगापूर मध्ये सय्यद गुलाम नबी सय्यद, कल्याण पश्चिम मतदारसंघांत अयाज गुलजार मोलवी, हडपसर येथे मोहम्मद अफरोज मुल्ला, मान मध्ये इम्तियाज जफर नदाफ, शिरोळ मधून आरिफ मोहम्मदाली पटेल आणि सांगली विधानसभा मतदारसंघात अल्लाउद्दीन हयातचंद काझी यांना उमेदवारी देण्यात आली होती.