महिला कर्मचाऱ्याला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ; अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

नाशिक पोलिसांनी 8 बांगलादेशी घुसखोरांना अटक केली

बारामती, 26 जूनः बारामतीतील प्रसिद्ध हॉस्पिटलमधील महिला कर्मचाऱ्याला मारहाण करत जातीवाचक शिवीगाळ झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर बारामती शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी डॉ. संग्राम काळे, डॉ. स्नेहल काळे, विजयालक्ष्मी काळे यांच्यावर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 प्रमाणे गुन्हा दाखल कलम 3[1 ] [ R] [5] कलम 3( 2) (va) कलम 3(1) (w)(i)(¡¡), नागरिक हक्क संरक्षण अधिनियम 1955 कलम 7( 1 ) ( d), भारतीय दंड संहिता 1860 कलम 354: 323: 504; 506 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच पीडित महिलेवरही संशयित आरोपींनी गुन्हे दाखल केले आहे. या बाबतचा पुढील तपास ठाणे अंमलदार सहाय्यक फौजदार सोनवलकर, तपास अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी इंगळे हे करीत आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हरिकृपा नगर येथील एका प्रसिद्ध हॉस्पिटल येथे पीडित महिला कर्मचारी गेल्या 7 वर्षांपासून मजुरीचे काम करीत आहे. त्या हॉस्पिटल शेजारी संशयित आरोपी डॉ. संग्राम काळे आणि डॉ. स्नेहल काळे यांचा दातांचा दवाखाना आहे. त्यामुळे सदर संशयित आरोपी पीडिताला पुर्वीपासून ओळखत आहेत. मात्र एक दिवशी पीडित कर्मचारी काम करत असताना डॉ. संग्राम काळे पीडित महिलेजवळ येत जातीवाचक शिवीगाळ करत माझे पेशंट परस्पर दुसरीकडे पाठवत असल्याचा आरोप करत विनयभंग केला. तसेच झालेल्या वादाचा आवाज ऐकून डॉ. स्नेहल काळे आणि संग्राम काळे यांच्या आई विजयालक्ष्मी काळे घराबाहेर येत जातीवाचक शिवीगाळ करत पीडिताला लाकडाने मारहाण केली. या घटनेनंतर पीडितेने बारामती शहर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली. या नंतर संशयित आरोपींनीही पीडितेवर गुन्हा दाखल केला आहे.

सदर प्रकरणात डॉ. संग्राम काळे, डॉ. स्नेहल काळे आणि विजयालक्ष्मी काळे यांनी अटक पूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र न्या. दरेकर सेशन कोर्टाने तो अर्ज 22 जून 2022 रोजी फेटाळला आहे. यानंतर या प्रकरणातील आरोपी सध्या फरारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *