जालना, 12 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनामाचे पत्र सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला होता. अशातच अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यामुळे काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे अशोक चव्हाण हे यापुढे कोणती भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://twitter.com/ANI/status/1756946909149769822?s=19
अशोक चव्हाण यांचा काँग्रेस पक्ष आणि आमदारकीचा राजीनामा
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सोपवला आहे. या पत्रात त्यांनी आपण 12 फेब्रुवारी रोजी मध्यान्हापासून मी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. या सोबतच अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे. त्यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे दिला आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करून दिली आहे. दरम्यान, अशोक चव्हाण हे भोकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते.
https://twitter.com/AshokChavanINC/status/1756954155380310433?s=19
मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता
तत्पूर्वी, अशोक चव्हाण यांच्या आधी मिलिंद देवरा आणि बाबा सिद्धीकी यांनी काँग्रेस पक्ष सोडला होता. त्यानंतर मिलिंद देवरा यांनी शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला होता. तर बाबा सिद्दीकी यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे अशोक चव्हाण यांची आता राजकीय भूमिका काय असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
One Comment on “अशोक चव्हाण यांचा काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा; आमदारकी देखील सोडली”