पुणे, 8 मेः संपुर्ण वारकरी सांप्रदायास आस लागलेल्या आषाढी वारीच्या तारख्यांच्या घोषणा करण्यात आल्या आहे. पुण्यातील देहू येथून संत तुकाराम महाराजांची पालखी 20 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार आहे. या सोहळ्याची घोषणा देहू संस्थांनने आज, रविवार 8 मे 2022 रोजी केली आहे. या घोषणेनंतर वारकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दरवर्षी या पालखी सोहळ्यात एकूण 329 दिंड्या सहभागी होतात. ही पालखी यंदा पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी करणार आहे. पायी प्रवास पूर्ण करून पालखी 9 जुलै रोजी पंढरपूरमध्ये पोहोचणार आहे. तसेच 10 जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी ही आळंदी येथून 21 जूनला प्रस्थान ठेवणार आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात पायी वारीत खंड पडला होता. आता आषाढी वारीची घोषणा झाल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
शेकडो वर्षांपासून संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अखंडितपणे पार पडत आहे. या पालखी सोहळ्याची घोषणा आज, रविवारी करण्यात आली आहे. यंदा हा पालखी सोहळा देहूतून 20 जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने हा सोहळा पुर्वी प्रमाणे पार पडणार असल्याने वारकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह दिसत आहे.
कोरोना काळात वारकऱ्यांना पायी वारीत सहभागी होता आले नाही. त्यांच्या पायी वारीत खंड पडला होता. मात्र परंपरेत खंड न पडू देता मोजक्या वारकऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा केला. ही आषाढी वारी यंदा मोठ्या थाटामाटात साजरी करण्यासाठी वारकरी मोठे उत्सुक असल्याचे दिसत आहेत. वारकऱ्यांकडून गावागावात तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे. सर्व वारकऱ्यांना संत तुकोबा आणि संत ज्ञानोबांच्या पालखी प्रस्थानाची आणि पायी विठोबाच्या चरणी माथा टेकविण्याची मोठी आस लागल्याचे चित्र आहे.