मुंबई, 2 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार, आशा स्वयंसेविकांच्या मानधनात 7 हजार रुपये वाढ करण्यात आली आहे. यासोबतच गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढ आणि गट प्रवर्तकांना प्रत्येकी 6 हजार 200 रुपये मानधन वाढ, आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्याचा निर्णय आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याची माहिती राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांनी दिली आहे.
दहावी-बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
दरम्यान राज्यात सध्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेअंतर्गत 80 हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका कामावर आहेत. तसेच राज्यात एकूण 3 हजार 664 गट प्रवर्तक कार्यरत आहेत. तर यापूर्वी आशा सेविकांना 5 हजार रुपये आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून 3 हजार रुपये असे मिळून 10 हजार रुपयांचे मानधन मिळत होते. मात्र, तानाजी सावंत यांच्या या निर्णयामुळे राज्यातील आशा सेविकांना प्रत्येकी 17 हजार रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे. तसेच गट प्रवर्तकांच्या बाबतीत सांगायचे झाल्यास, गट प्रवर्तकांना याच्या आधी 6 हजार 200 रुपये आणि केंद्र सरकारमार्फत 8 हजार 775 रुपये असे मिळून 14 हजार 975 रुपये इतके मानधन मिळत होते. तर राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे गट प्रवर्तकांना आता 21 हजार 175 रुपयांचे मानधन देण्यात येणार आहे.
पाणी पिणे सोडणार, जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
यासोबतच आशा सेविका व गट प्रवर्तकांना प्रत्येकी 2 हजार रुपये दिवाळी बोनस देखील मिळणार आहे. त्यामुळे यंदाची दिवाळी आशा सेविका व गट प्रवर्तकांसाठी आनंददायी ठरणार आहे. तत्पूर्वी, या बैठकीला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तानाजी सावंत यांच्यासह आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, आरोग्य सेवा आयुक्त, आरोग्य विभागातील प्रमुख अधिकारी यांच्यासह आशा स्वयंसेविका आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
One Comment on “आशा सेविकांची दिवाळी होणार गोड; राज्य सरकारचा मोठा निर्णय”