पोलीस कारवाईत तब्बल 54 लाखांचा गांजा जप्त

इंदापूर, 15 ऑक्टोबरः इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी गावच्या हद्दीत इंदापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पुणे ग्रामीण यांनी संयुक्त कारवाई केली. या कारवाईत तब्बल 218 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा पदार्थासह टाटा कंपनीची हॅरिहर कार, ह्युंदाई कंपनीची आय 20 कार आणि अल्टो कार असे तब्बल 54 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेत पाच जणांना अटक केली.

उजनी प्रदूषणमुक्त करण्याची जानकरांची मागणी

सदर कारवाईत अमिर मुलाणी (रा. मळद, ता. बारामती), प्रकाश हळदे (वय 37, रा. बारामती; मूळ रा. मुखई एसटी स्टॅंडजवळ, ता. शिरूर), खंडू परखड (वय 29, रा. पाव्हणेवाडी, ता. बारामती; मूळ रा. लोणीपारवडवस्ती ता. जामखेड), रोहन उर्फ फलेसिंग जगताप (वय 33, रा. देसाई इस्टेट, बारामती), सूरज कोकरे (वय 32, रा. हनुमंतवाडी पणदरे) अटक केली असून यांच्याविरूद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

माळेगावात अवैध धंद्यांवर धडक कारवाई

दरम्यान, पोलिसांनी इंदापूर-सरडेवाडी टोल नाक्‍यावर सापळा लावला असता, एक आय 20 कार व त्याच्या पाठीमागे एक पांढरे रंगाची टाटा कंपनीची हॅरीहर कार जाताना पोलिसांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. हॅरीहर कार न थांबता पुण्याच्या दिशेने गेल्याने पोलिसांनी तिचा पाठलाग केला. सदर कार निमगाव केतकी गावच्या हद्दीत सोनाई डेअरीजवळ ताब्यात घेऊन चालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाडवीची उत्तरे दिली. संशय अधिक आल्याने पोलिसांनी त्या वाहनाची तपासणी केली. गाडीच्या डिक्कीमध्ये तसेच मधल्या सिटच्या खाली गांजाची पाकिटे आढळली. या कारला बेकायदेशीर रित्या वाहतूक करण्यासाठी आय 20 कार (एमएच 05 सीएम 8500) व अल्टो कार (एमएच 18 व्ही 465) ही मागे पुढे पायलेटींग करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी दोन्ही कार ताब्यात घेतल्या.

One Comment on “पोलीस कारवाईत तब्बल 54 लाखांचा गांजा जप्त”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *