डोक्याचे जेवढे केस पिकलेत, तेवढी आंदोलने केलीत – छगन भुजबळ

हिंगोली, 26 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) हिंगोली येथे सध्या ओबीसी समाजाची महाएल्गार सभा सूरू आहे. या सभेला ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित झाले आहेत. या सभेतून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आज पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली. “पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते!” अशी त्यांनी जरांगे पाटील यांचे नाव न घेता टीका केली.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसरा टी-20 सामना

“मी काही बोललो तर महाराष्ट्रातील अनेक नेत्यांना असे वाटते की, मी दोन समाजात तेढ निर्माण करतोय. मात्र त्यांच्या पंधरा वीस सभा झाल्या की आमची एक सभा होते. ते आम्हाला काहीही बोलतात तरीही आम्ही गप्प बसतो. तसेच गेल्या दोन महिन्यांपासून मला आणि माझ्या कुटुंबाला गलिच्छ शिव्या दिल्या जात आहेत. या शिव्या कोणी वाचू शकत नाहीत. आम्ही कसं जगायचं?” असा सवाल छगन भुजबळ यांनी यावेळी उपस्थित केला.

“या छगन भुजबळनी तुमच्या आंदोलनात कधी एक दगड मारला नाही किंवा टायर जाळला नाही. उलट तेच जाळतायेत, तेच दगड मारतायेत. त्यांनीच घरं-दारं पेटवली, अख्खा बीड पेटवला. जे पेटवत आहेत त्यांना बोला ना मग! त्यांना मला सांगायचं आहे, पेटवायला अक्कल लागत नाही, पटवायला अक्कल लागते. जाळायला अक्कल लागत नाही, जुळवायला अक्कल लागते. मोडायला अक्कल लागत नाही, घडवायला अक्कल लागते!” अशा शब्दांत छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला.

दगडफेकीचा कट कोणी रचला? नितेश राणेंचा शरद पवारांना सवाल

तर मागे एकदा जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका करताना ते म्हातारे झाल्याचे म्हटले होते. त्यांच्या या टीकेला छगन भुजबळ यांनी यावेळी प्रत्युत्तर दिले आहे. “आता नवीन बोलायला लागला. भुजबळ म्हातारा झाला म्हणतो. सर्वच म्हातारे होणार आहे. तुझे आई वडील देखील म्हातारे असतील. पण डोक्याचे जेवढे केस पिकले आहेत, तेवढी आंदोलने केली आहेत.” असे छगन भुजबळ यावेळी म्हणाले.

One Comment on “डोक्याचे जेवढे केस पिकलेत, तेवढी आंदोलने केलीत – छगन भुजबळ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *