13 जागांसाठी तब्बल 61 इच्छुक रिंगणात!

बारामती, 3 डिसेंबरः राज्य निवडणूक आयोगाकडून ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 चा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या अनुसार, मतदान प्रक्रिया 18 डिसेंबर 2022 पर्यंत पार पडणार आहे. बारामती तालुक्यातील तब्बल 13 ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच आणि सदस्य पदासाठी अर्ज भरण्याचा 2 डिसेंबर 2022 हा अखेरचा दिवस होता.

पोलिसांकरिता पोस्को कायद्याचे प्रशिक्षण

या निवडणुकांसाठी 28 नोव्हेंबर 2022 पासून सरपंच आणि सदस्य उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी सुरुवात झाली होती. आतापर्यंत मोरगाव, वाघळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गरदडवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी आणि पळसी या एकूण 13 ग्रामपंचायतींच्या जागांसाठी तब्बल 61 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. वाघळवाडी ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंच पदासाठी 2 डिसेंबर 2022 रोजी तब्बल 13 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यामुळे या होणाऱ्या निवडणुकींकडे सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

बारामतीत जागतिक एड्स दिनानिमित्त समानता संकल्पना

दाखल अर्जांची छाननी 5 डिसेंबर 2022 पर्यंत केली जाणार आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 7 डिसेंबर आहे. मतदान 18 डिसेंबर रोजी असून निकाल 20 डिसेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे.
बारामती, ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022, राज्य निवडणूक आयोग, सरपंच पद, उमेदवारी अर्ज, बातमी

One Comment on “13 जागांसाठी तब्बल 61 इच्छुक रिंगणात!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *