बारामती, 1 ऑक्टोबरः बारामती येथील प्रशासकीय भवन येथे संजय गांधी निराधार अनुदान योजना लाभार्थी निवडीसाठी शुक्रवारी, 30 सप्टेंबर 2022 रोजी तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत संजय गांधी निराधार योजनेची तब्बल 348 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
पुन्हा रंगणार BPL-4 मधील खेळाडूंचा लिलाव
या बैठकीत एकूण 374 अर्जाची छाननी करण्यात आली. यात संजय गांधी योजनेच्या 263 प्राप्त अर्जापैकी 253 मंजूर तर 10 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 96 प्राप्त अर्जापैकी 81 अर्ज मंजूर तर 15 अर्ज नामंजूर करण्यात आले. इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त 13 अर्ज मंजूर करण्यात आले. तर राष्ट्रीय कुटुंब योजनेचे 2 अर्जापैकी 1 अर्ज मंजूर करण्यात आला.
BPL- 4 Live ऑक्शन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.