तालुक्यातील तब्बल 300 गुर्‍हाळ घरे बंद!

दौंड, 12 नोव्हेंबरः उसाच्या किमतीत वाढ झाली असताना गुळाच्या किमती मात्र कमी झाल्या आहेत. परिणामी दौंड तालुक्यातील गुर्‍हाळ व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. यामुळे दौंड तालुक्यातील तब्बल 300 गुर्‍हाळघरे बंद करण्यात आली आहेत.

कृषि उन्नती योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

या सर्व प्रकाराने गुर्‍हाळचालक मेटाकुटीला आले आहेत. तालुक्यात सध्या गुर्‍हाळाला 2 हजार 600 रुपये उसाला बाजारभाव मिळत आहे. तर गुळाचा बाजारभाव कमी झाल्याने एका क्विंटलला म्हणजे 100 किलोला 3 हजार रुपये बाजारभाव झाला आहे. गुळाचा उत्पादन खर्च प्रति किलोला 8 रुपये होत असल्याने गुर्‍हाळचालक अडचणीत सापडल्याची माहिती गुर्‍हाळचालक प्रमोद भागवत यांनी दिली.

बारामतीत सायकल यात्रेतून सामाजिक संदेश देत जनजागृती

दौंड तालुक्यात सुमारे 1 हजार गुर्‍हाळांची संख्या आहे. त्यातील अंदाजे 300 गुर्‍हाळ मालकांनी ती बंद केली आहेत. तर परप्रांतीय गुर्‍हाळचालक यामुळे पळून गेले आहेत. यामुळे याचा तोटा येथील स्थानिक मालकांना सोसावा लागत आहेत. स्थानिक गूळ व्यापारी गुळाला म्हणावा, असा बाजारभाव देत नसल्याने नेमका विश्वास परप्रांतीय व्यापार्‍यांवर ठेवावा की स्थानिक व्यापार्‍यांवर ठेवावा, हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. पाटस परिसरातील 12 पैकी 6 गुर्‍हाळघरे याच कारणांनी गुर्‍हाळ मालकांनी बंद केल्याची माहिती गुर्‍हाळचालक प्रमोद भागवत यांनी दिली.

2 Comments on “तालुक्यातील तब्बल 300 गुर्‍हाळ घरे बंद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *