बारामती, 1 मार्चः (प्रतिनिधी- शरद भगत/ दीपक नलवडे) बारामती तालुक्यातील पारवडी येथील कै. जिजाबाई दादासाहेब गावडे विद्यालयात 28 फेब्रुवारी 2023 रोजी विज्ञान दिन साजरा करण्यात आला. या विज्ञान दिनानिमित्ताने शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि विद्यार्थ्यांनी चिकित्सक वृत्ती जोपासली पाहिजे, विज्ञानामुळे विद्यार्थ्यांच्या कल्पना शक्तीचा, सृजनशीलतेचा विकास होत असतो. देशाचे भवितव्य घडवणारे ग्रामीण भागातील बालवैज्ञानिक अशाच शालेय विज्ञान प्रदर्शनातून पुढे येतील, असा विश्वास विद्यालयाचे प्राचार्य सखाराम गावडे सरांनी उद्घाटन प्रसंगी व्यक्त केला.
बानपच्या भंगार चोरीच गोलमाल?
विद्यालयातील 950 विद्यार्थ्यापैकी 247 विद्यार्थ्यांनी आपले प्रयोग सादर केले होते. विद्यार्थ्यानी या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणात उत्स्फुर्त असा प्रतिसाद दिला. या प्रदर्शनाचे आयोजन विद्यालयाच्या भव्य अशा मैदानात करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य सखाराम गावडे सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.
बारामती उपविभागात तब्बल 107 प्रकल्प मंजूर
या विज्ञान प्रदर्शनात डायलिसिस मशीन, खत टाकणी यंत्र, फळ तोडणी यंत्र, कार्बन सायकल, फुफ्फुसाची कार्यक्षमता तपासणी यंत्र आदींसारखे अनेक प्रयोग विद्यार्थ्यांनी सादर केले होते.
सखाराम गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन विज्ञान विभाग प्रमुख दत्तात्रय फडतरे, रमेश काशीद, अर्चना ठोंबरे, स्मिता गायकवाड, किशोर खटके यांनी केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब गावडे, सचिव संगीता गावडे, जिजाबा गावडे, अंबादास गवंड, तानाजी गावडे, मोहन सांगळे, अनिल आटोळे व ग्रामस्थ यांनी या सर्व उपक्रमाचे कौतुक केले. तसेच या छोट्या वैज्ञानिकांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
One Comment on “आंतरशालेय विज्ञान प्रदर्शनात तब्बल 247 प्रयोग सादर”