बारामती, 31 डिसेंबरः बारामती येथील तहसिल कार्यालयात 30 डिसेंबर 2022 रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजना संदर्भात तहसिलदार विजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. सदर बैठकीत तब्बल 227 प्रकरणांना मंजुरी देण्यात आली.
वर्धापन दिनानिमित्त बारामती नगरपरिषदेचे आवाहन
या बैठकीत एकूण 238 अर्जांची छाननी करण्यात आली. यामध्ये संजय गांधी योजनेच्या 160 प्राप्त अर्जांपैकी 155 मंजूर तर 5 अर्ज नामंजूर करण्यात आले. श्रावणबाळ योजनेचे 65 प्राप्त अर्जांपैकी 59 अर्ज मंजूर तर 6 अर्ज नामंजूर करण्यात आले. तसेच इंदिरा गांधी योजनेचे प्राप्त 10 तर राष्ट्रीय कुटुंब योजनेचे प्राप्त 3 अर्ज मंजूर करण्यात आले.
राज्य ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना
2 Comments on “तब्बल 227 निराधारांची प्रकरणे मंजूर”