सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्याला अटक, पुण्यातील घटना

पुणे, 27 जून: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील दत्तनगर परिसरातील एका सोन्याच्या दुकानात चोरी करणाऱ्या सेल्समनला पोलिसांनी अटक केली आहे. यावेळी त्याच्याकडून पोलिसांनी 5 लाख रुपयांचे दागिने जप्त केले. ही कारवाई पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी केली आहे. विवेक दाभोळकर (वय-31) असे अटक केलेल्या सेल्समनचे नाव आहे. तो पुणे शहरातील आंबेगाव खुर्द भागातील जांभुळवाडी रोड परिसरातील दत्तनगर येथील एका सराफाच्या दुकानात सेल्समनची नोकरी करीत होता. या सेल्समनने 16 जून रोजी ह्या सराफाच्या दुकानात चोरी केली आणि त्यानंतर तो पळून गेला होता.



याप्रकरणी विवेक दाभोळकर याच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भादंवि कलम 381 नुसार गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर भारती विद्यापीठ पोलीस या आरोपीचा शोध घेत होते. त्यावेळी आरोपी विवेक दाभोळकर हा धायरी परिसरातील रायकर मळा येथे थांबला असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी रायकर मळा येथे जाऊन आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. यावेळी पोलिसांनी विवेक दाभोळकर याच्याकडून 7 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या दागिन्यांची किंमत सुमारे 5 लाख रुपये आहे.



ही कारवाई भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शरद झिने, तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सगीर कदम, पोलीस उपनिरीक्षक धिरज गुप्ता, पोलीस अंगलवार धनाजी धोत्रे, सचिन गाडे, सचिन सरपाले, शैलेश साठे, नामदेव रेणुसे, चेतन गोरे, महेश बारवकर, हनमंत मासाळ, निलेश ढमढेरे, मंगेश पवार, निलेश जमदाडे, सतिश मोरे, अवधुत जमदाडे, निलेश खैरमोडे, विक्रम सावंत, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले यांच्या पथकाने केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *