बारामती, 29 जानेवारीः कोरोना काळ आणि त्यानंतर उद्भवलेल्या आर्थिक मंदीमुळे मागील तीन वर्षात संपूर्ण अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. यामुळे प्रामुख्याने गोरगरीब, हातावरचे पोट असणारे, छोटे उद्योजक, व्यवसायिक व मागासवर्गीय लोकांची आर्थिक कुचुंबना झाली आहे. संबंधितांना केवळ जगणे दुरापास्त होत आहे. यामुळे अनेक प्रकारचे कर व मालमत्ता कर भरणे शक्य होणार नाही. याकरीता कोरोना काळातील थकीत मालमत्ता कर बारामती नगरपरिषद प्रशासनाने किमान 50 टक्के माफ करावा. तसेच चालू वर्षाची घरपट्टी तेवढी घ्यावी, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पुणे जिल्हा सचिव सुनील शिंदे यांनी निवेदनाद्वारे बानपचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांच्याकडे 28 जानेवारी 2023 रोजी केली आहे.
महाराष्ट्र राज्य आयटीआय कर्मचारी संघटनेच्या सचिव पदी गणेश चव्हाण यांची निवड
कोरोना नंतरच्या काळात विस्कटलेली आर्थिक घडी निस्तारता निस्तारता नागरिकांच्या नाकी नऊ येऊ लागले असताना शासन नगरपालिका प्रशासन थकित मालमत्ता कर संदर्भात काहीतरी दिलासादायक निर्णय घेऊ शकते. या आशेवर अनेक नागरिक असल्याकारणाने बहुतेकांनी मालमत्ता कर भरलेले नाही. यामुळे जवळजवळ 30-35 कोटी रुपये नगरपालिकेला मालमत्ता कर थकीत राहिला आहे. तसेच यामुळे नगरपालिका प्रशासनाची अडचण होऊ शकते. त्याच करीता घरपट्टी, पाणीपट्टी, मालमत्ता थकित करांमध्ये घसघशीत सूट जाहीर करावी, त्याबरोबर चालू घरपट्टी भरून घ्यावी, तसेच शासन परवानगी नसलेल्या घरांच्या संदर्भात आवास्तव शास्ती कर माफ करावा, पाच वर्षांपूर्वी पर्यंतच्या परवानगी नसलेली घर बांधकामे नियमित करावीत, थकित घरपट्टीवर आकारलेले व्याज रद्द करावे आदी मागण्या मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहे.
रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक
यावेळी रिपब्लिकन पक्षाचे युवक जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र (पप्पू) सोनवणे, शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, संपर्कप्रमुख निलेश जाधव, शहर उपाध्यक्ष रामहरी बल्लाळ, गणेश जाधव, राजेंद्र लांडगे आदी कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
One Comment on “कोरोना काळातील थकित मालमत्ता कर बानपने माफ करावा- आरपीआय”