बारामती नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

बारामती, 5 जुलैः बानपचे स्थानिक ठेकेदार व स्थानिक कामगार यांच्या वतीने बारामती नगरपरिषद समोर ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, 18 फेब्रुवारी 2022 रोजी प्रसिद्ध केलेल्या बानप आरोग्य विभागाच्या (स्वच्छतेचे नविन निविदा सूचना नं घनकचरा 02/2021-2022) या 13 कोटीच्या कामाचा निवीदा कालावधी संपून गेला तरी कामाचा आदेश आलेला नाही. सर्व नियम पायदळी तुडवून निविदाची कार्यवाही चालुच ठेवलेला आहे, त्यामुळे जाचक आटी शर्ती रद्द करून फेरनिविदा काढावी या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी अ‍ॅड.अमोल सातकर यांनी ‘भारतीय नायक’शी बोलताना सांगितले की, मुख्याधिकारी हे चुकीच्या पध्दतीने काम करतात, मुख्यधिकाऱ्यांनी ज्या ज्या ठिकाणी काम केले, त्या त्या ठिकाणी ते स्वतःचा ठेकेदार घेऊन जातात व त्यालाच ठेका देतात. दरम्यानच्या काळात बारामती नगरपरिषदेसाठी जवळपास 25 कोटी रुपयांची खरेदी झाली. सर्व खरेदी विटा माईणी, शिरूर या ठिकाणावरुन करण्यात आलेली दिसते. स्थानिक लोक या ठिकाणी कर भरून नगरपरिषदेसाठी निधी उपलब्ध करतात. नगरपरिषदेसाठी लागणारी साधन सामग्रीची खरेदी या ठिकाणी केली तर इथले लोकांना दोन पैसे मिळतील, किंवा स्थानिक लोकांच्या हाताला रोजगार मिळेल. परंतु मुख्यधिकाऱ्यांना स्थानिक लोकांचा काय राग आहे, हे समजत नाही. मुख्याधिकारी आल्यापासुन त्यांनी कर्मचाऱ्यांचे जुन्या बँकेतील खाते बंद करून नविन बँकेत खाती काढली आहेत.

गाड्यासाठी लागणारे डिझेल, त्याचे डिझेल पंपदेखील बदलेले आहेत. पुनावाला गार्डनमध्ये साधी मुझिक सिस्टीम लावली आहे, ती सुद्धा बारामतीमध्ये खरेदी करावी, असे वाटले नाही आणि स्थानीक ठेकेदारांना डावलून एका विशिष्ठ ठेकेदाराला काम देण्याच्या अट्टहास का, हे बाहेरचे ठेकेदार कामागार देखील बाहेरून आणतात, पर्यायी स्थानिक कामगारांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे. या स्थानिक कामगारांनी कोव्हिडच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता काम केले त्या कामगारांवर आज उपासमारीची वेळ या मुख्याधिकाऱ्यांमुळे आल्याचा आरोप अ‍ॅड. सातकरांनी यावेळी केला.

यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष अ‍ॅड.अमोल सातकर, शुभम मोरे यासह सर्व स्थानिक ठेकेदार मानसिंग जाधव, कैलास काकडे, मंगेश मोरे, वल्लभ मलगुंडे, जमिर सय्यद तसेच स्थानिक कामगार व महिला कामगार उपस्थित होते.

पीएनएसच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *