रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक

बारामती, 28 जानेवारीः बारामती येथील बस स्थानक हे नेहमी गजबजलेले दिसते. या बस स्थानकावर अनेकजण त्यांच्या त्यांच्या डेस्टीनेशनकडे जा-ये करत असतात. मात्र या धावपळीमुळे अनेकांचे काही न काही वस्तू या बस स्थानकावर विसरून राहत असतात.

होमगार्ड कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

असंच काही सातार येथील मनाली ननवरे यांच्या सोबत आज, 28 जानेवारी 2023 रोजी घडलं. मनाली या बारामतीहून त्यांच्या डेस्टीनेशनकडे जाण्यासाठी बारामती बस स्थानकात रिक्षाने आल्या. मात्र घाई घाईत त्यांचा मोबाईल रिक्षामध्ये राहून गेला. मात्र त्यांचा मोबाईल संबंधित रिक्षा चालक चांगदेव फुलावळे (रा. तांदुळवाडी, बारामती) यांना सापडला. मनाली यांचा शोध घेऊनही त्या सापडल्या नसल्याने रिक्षा चालक चांगदेव फुलावळे यांनी बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये सदर मोबाईल फोन आणून दिला.

जातिवादी प्रजासत्तक 2023

काही वेळात मनाली हिचा शोध घेऊन सदर फोन केशव फुलावळे यांच्या हस्ते तिला देण्यात आला. सध्या रिक्षा चालक केशव फुलावळे यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.

One Comment on “रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचे कौतुक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *