बानपच्या नगर रचनाकार पदी रमेशकुमार आवताडे यांची नियुक्ती

मुंबई, 27 जूनः महाराष्ट्र शासनच्या नगर विकास विभागाने 26 जून 2023 रोजी नगर रचनाकार विभागासंदर्भात एक शासन आदेश जारी केला आहे. या आदेशात सहायक नगर रचनाकार (पदवीधारक / पदविकाधारक) संवर्गातील अधिकाऱ्यांना नगर रचनाकार (पदवीधारक / पदविकाधारक) पदावर तदर्थ पदोन्नतीने पद स्थापना देण्यात आल्याचे म्हटले आहे. या आदेशात एकूण 15 जणांना सेवा ज्येष्ठतानुसार पदोन्नती देण्यात आली आहे. या आदेशामुळे सहायक संचालक, नगर रचना बारामती नगरपरिषदेला आता पुर्णवेळ रमेशकुमार आवताडे हे नवे नगर रचनाकार मिळाले आहेत.

‘त्या’ पारधी अनाथ मुलांसाठी पोलिसांनी खुलं केलं शिक्षणाचे दार!

दरम्यान, रमेशकुमार आवताडे हे सहायक संचालक, नगर रचना बारामती विभागात बारामती शाखेत सहायक संचालक म्हणून गेली चार वर्षे कार्यरत होते. त्या आधी ते सोलापूर शाखेच्या नगर रचना विभागात 20 वर्ष काम केले. त्यानंतर त्यांची बदली सांगली येथील नगर रचना विभागात झाली. तेथे त्यांनी 4 वर्ष काम पाहिले.

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे अनुसूचित जातीमधील माने कुटुंब उद्ध्वस्त!

त्यानंतर त्यांची बदली ही बारामती विभागातील नगर रचना बारामती शाखेत झाली. आता रमेशकुमार आवताडे यांनी नवे बारामती नगरपरिषदेचे नवे नगर रचनाकार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीनंतर सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

One Comment on “बानपच्या नगर रचनाकार पदी रमेशकुमार आवताडे यांची नियुक्ती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *