मुंबई, 7 जुलैः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वात काल, 6 जुलै 2023 रोजी दिल्ली येथील निवासस्थानी कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी अजित पवारांसह इतर बंडखोर नेत्यांना शिस्तभंगाची कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेसमधून निलंबित केले.
या निलंबनानंतर अजित पवार यांच्या नेतृत्वात आज, शुक्रवारी 7 जुलै रोजी 2023 रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीतून निलंबित केलेले प्रफुल पटेल यांनी मोठा खुलासा केला आहे. पत्रकार परिषदेत पटेल म्हणाले की, ‘आमच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्या राष्ट्रवादी पक्षाच्या संविधानानुसार करण्यात आलेल्या नाहीत, त्यामुळे आम्हाला निलंबित करण्याचा कुणाला अधिकार नाही, याबाबतचा निर्णय आता निवडणूक आयोगच घेईल.’
महसूल विभागाचा सावळा गोंधळ; ई-पिक पाहणी अॅप बंद?
या खुलासानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या असंविधानिक असल्याचा दावा प्रफुल पटेल यांनी केला आहे. त्यामुळे निलंबित झालेले नेते हे निलंबितच होऊ शकत नाही, असा दावाच पटेलांनी यावेळी केला.
प्रफुल पटेल यांच्या दाव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या या असंविधानिक आहे का? जो राष्ट्रवादी पक्ष हा फुले- शाहू- आंबेडकर यांचे नाव घेत आज पर्यंत राजकारण करत आला, संविधानाचे सदैव दाखले देत आला, तो राष्ट्रवादी पक्षा असंविधानिक असल्याचा दावा आज त्यांच्या पक्षातील बंडखोर निलंबित नेते प्रफुल पटेलांनी केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम चुकीचे आहे का? असा तर्क सध्या सर्वसामान्यांकडून लावला जात आहे.
अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचे आमदार पडळकरांच्या हस्ते अनावरण
One Comment on “राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असंविधानिक?”