पुणे, 30 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत समाप्त झाली आहे. पुणे जिल्ह्यात 21 मतदारसंघ आहेत. या मतदारसंघात 551 उमेदवारांनी एकूण 774 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. याची माहिती पुणे निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील इंदापूर मतदारसंघात सर्वाधिक 38 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. तर जुन्नर मतदारसंघात सर्वात कमी 17 उमेदवारांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, या सर्व उमेदवारी अर्जांची आज छाननी होईल. तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 नोव्हेंबरपर्यंत आहे त्यानंतर जिल्ह्यातील सर्व लढतींचे चित्र स्पष्ट होईल.
https://x.com/Info_Pune/status/1851483332581998732?t=XWDQRovaJt3twwG1Ad_pig&s=19
पहा कोणत्या मतदारसंघात किती अर्ज?
विधानसभा निवडणुकीसाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर मतदारसंघात 17 उमेदवारांनी 29 अर्ज दाखल केले आहेत. आंबेगाव मध्ये 20 उमेदवारांनी 31 अर्ज, खेड आळंदी मतदारसंघात 23 उमेदवारांनी 34 अर्ज, शिरूर मध्ये 28 उमेदवारांनी 42 अर्ज, दौंडमध्ये 22 उमेदवारांनी 27 अर्ज, इंदापूरमध्ये 38 उमेदवारांनी 52 अर्ज, बारामतीत 36 उमेदवारांनी 46 अर्ज, पुरंदरमध्ये 28 उमेदवारांनी 40 अर्ज, भोरमध्ये 23 उमेदवारांनी 31 अर्ज, मावळमध्ये 18 उमेदवारांनी 26 अर्ज, चिंचवडमध्ये 32 उमेदवारांनी 44 अर्ज, पिंपरीमध्ये 39 उमेदवारांनी 45 अर्ज दाखल केले आहेत.
भोसरीमध्ये 24 उमेदवारांनी 33 अर्ज, वडगाव शेरी मतदारसंघात 24 उमेदवारांनी 34 अर्ज, शिवाजीनगर मध्ये 24 उमेदवारांनी 30 अर्ज, कोथरूडमध्ये 23 उमेदवारांनी 36 अर्ज, खडकवासला मतदारसंघात 28 उमेदवारांनी 39 अर्ज, पर्वती मतदारसंघात 22 उमेदवारांनी 37 अर्ज, हडपसरमध्ये 35 उमेदवारांनी 51 अर्ज, पुणे कॅन्टोनमेंट मतदारसंघात 27 उमेदवारांनी 38 अर्ज आणि कसबा पेठ मतदारसंघात 20 उमेदवारांनी 29 अर्ज दाखल केले आहेत.