बारामती, 31 ऑक्टोंबर: (विश्वजीत खाटमोडे) येत्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यातील बारामती मतदारसंघात 36 उमेदवारांनी 46 अर्ज दाखल केले होते. निवडणूक आयोगाकडून या सर्व उमेदवारी अर्जांची छाननी बुधवारी (दि.30) करण्यात आली. या छाननी मध्ये बारामती विधानसभा मतदारसंघात 4 उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. तर 32 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे.
अजित पवार यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवाराचा अर्ज बाद
दरम्यान, राज्यात विधानसभा निवडणुकीची सगळीकडे चर्चा आहे. या निवडणुकीसाठी राज्यातील अनेक मतदारसंघात नावाशी साधर्म्य असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. याचा फटका प्रमुख उमेदवारांना बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात देखील अजित पवार यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या एका व्यक्तीने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अजित प्रदीप पवार असे या उमेदवाराचे नाव असून, त्यांनी सनय छत्रपति शासन पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु, अर्जांच्या छाननी मध्ये हा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. याशिवाय, बारामती मतदारसंघातील विनोद चांदगुडे आणि दिलीप नाळे या अपक्ष उमेदवारांचा अर्ज बाद झाला आहे. तसेच भारतीय नवजवान सेना पक्षाच्या बाळासो धापटे नावाच्या उमेदवारांचा देखील अर्ज बाद झाला आहे.
बारामती मतदारसंघात अर्ज वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे
1) अभिजीत आवाडे-बिचुकले – अपक्ष
2) चंद्रकांत खरात – बहुजन समाज पार्टी
3) अनुराग खलाटे – अपक्ष
4) सुरेंद्र जेवरे – अपक्ष
5) सविता शिंदे – अपक्ष
6) सीमा चोपडे – अपक्ष
7) धनंजय गडतरे – अपक्ष
8) पंढरीनाथ रसाळ – अपक्ष
9) संभाजी होळकर – अपक्ष
10) कौशल्या भंडलकर – अपक्ष
11) गणेश खामगळ – अपक्ष
12) दत्तात्रय जराड – अपक्ष
13) पंकज भिसे – अपक्ष
14) अब्दुलरोफ मुलाणी – अपक्ष
15) मंगलदास निकाळजे – वंचित बहुजन आघाडी
16) अभिजित कांबळे – अपक्ष
17) विनोद जगताप – अपक्ष
18) अजित पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
19) दादा थोरात – अपक्ष
20) सोयल शेख – समता पार्टी
21) युगेंद्र पवार – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार
22) कल्याणी वाघमोडे – अपक्ष
23) मारूती चोपडे – राष्ट्रीय समाज पक्ष
24) अमोल आगवणे – अपक्ष
25) शिवाजी कोकरे – अपक्ष
26) मिथुन आटोळे – अपक्ष
27) राहुल थोरात – अपक्ष
28) सचिन आगवणे – अपक्ष
29) संतोष कांबळे – अपक्ष
30) त्रिशला कांबळे – बहुजन समाज पार्टी (आंबेडकर)
31) विक्रम कोकरे – अपक्ष
32) अमोल चौधर – अपक्ष