बारामती, 4 एप्रिलः (प्रतिनिधी- शरद भगत) राज्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यांची महाविकास आघाडी आणि भाजप शिवसेनेची युती यांच्यात चुरस पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांची रंगतदार लढत होणार असल्याचे चित्र आहे.
वैदकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या बांधकामात न्यायालयाचा अवमान!
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत उमेदवारी अर्ज करण्याचा 3 एप्रिल 2023 हा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी भारतीय जनता पार्टी कडून शेतकरी विकास पॅनलच्या उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.
मुर्टी गावात कावडीचे विधिवत पूजन
सदर उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजपचे ज्येष्ठ नेते रंजन तावरे, जी. बी गावडे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, बारामती तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे, संघटक सरचिटणीस प्रमोद खराडे, शशिकांत कोकरे, अॅड. ज्ञानेश्वर माने, अॅड. शाम कोकरे, युवराज तावरे, राजाभाऊ देवकाते, महेंद्र तावरे यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
One Comment on “कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत युतीच्या उमेदवारीचे अर्ज दाखल”