वयाच्या 17 व्या वर्षीही करता येणार मतदान कार्डसाठी अर्ज

नवी दिल्ली, 28 जुलैः निवडणूक आयोगाने आज, 28 जुलै 2022 रोजी मतदान ओळपत्र संदर्भात एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार देशातील 17 वर्षीय तरुण-तरुणींना आता मतदार ओळखपत्र मिळणार आहे. वयाची 17 वर्षे पूर्ण केलेल्या तरुण तरुणींना आता मतदान कार्डसाठी अर्ज करता येणार आहे. यामुळे मतदान कार्डसाठी तरुण तरुणींचं वय 18 वर्ष पूर्ण असणं आता आवश्यक नाही.

या संदर्भात निवडणूक आयोगाने 28 जुलै 2022 रोजी नवीन निर्देश दिले आहेत. या निर्देशानंतर, 1 जानेवारी 2023 रोजी 18 वर्षे पूर्ण करणारे तरुण मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करू शकतात. या संदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनूप चंद्र पांडे यांनी सूचना दिल्या आहेत. आता तरुणांना मतदान कार्डसाठी वर्षातून तीनदा आगाऊ अर्ज करता येणार आहे.

बारामती पंचायत समितीचं आरक्षण जाहीर

निवडणूक आयोगाच्या नवीन सूचनेनुसार, तरुणांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबरलाही मतदान ओळखपत्रासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी निवडणूक आयोग नवीन नोंदणी फॉर्म आणणार आहे. याकरिता तुम्हाला आधार कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. मात्र, आधार कार्डची सक्ती असणार नाही. तुम्ही अर्जदार म्हणून स्वेच्छेनेही माहिती देऊ शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *