निवडणुकांसंदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन

बारामती, 15 डिसेंबरः ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2022 च्या कार्यक्रमांतर्गत बारामती तालुक्यात 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत 13 ग्रामपंचायतीत एकूण 66 मतदान केंद्रावर मतदान होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक शांततेत पार पाडावी, असे आवाहन प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.

बारामतीत सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज!

तालुक्यातील 13 ग्रामपंचायतीमध्ये सरपंच पदासाठी 36 तर 127 सदस्य पदासाठी 291 उमेदवार रिंगणात आहेत. वाणेवाडी ग्रामपंचायतीत 4, सोरटेवाडीतील 3, सोनकसवाडी, मोरगाव व गडदरवाडी येथील प्रत्येकी 1 असे एकूण 10 सदस्य पदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरीत मोरगाव, वागळवाडी, पणदरे, मुरुम, वाणेवाडी, गडदरवाडी, सोरटेवाडी, कुरणेवाडी, सोनकसवाडी, काऱ्हाटी, लोणी भापकर, मासाळवाडी व पळसी या ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्य पदांसाठी मतदान होणार आहे.

निवडणूक प्रक्रीया यशस्विपणे राबवण्यासाठी 462 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान प्रक्रीया पार पाडल्यानंतर सर्व सीलबंद मत पेट्या बारामती येथील तहसिल कार्यालयातील हॉलमध्ये पोलीस बंदोबस्तात ठेवण्यात येणार आहेत. प्रशासकीय भवनातील बैठक सभागृहात 20 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल, अशी माहिती तहसिलदार विजय पाटील यांनी दिली आहे.

शाईफेक प्रकरणातील आंबेडकरी कार्यकर्त्यांचा अखेर जामीन मंजूर

आचार संहितेचे पालन करण्यात यावे. उमेदवारांनी कोणत्याही प्रकारचे मतदारांना प्रलोभन दाखवू नये. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळित पार पाडण्यासाठी प्रत्येक केंद्रावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रावर कायदा व सुव्यवस्थेचे पालन करण्यात यावे, असे आवाहनही विजय पाटील यांनी केले आहे.

One Comment on “निवडणुकांसंदर्भात प्राधिकृत अधिकाऱ्यांचे उमेदवारांना आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *