‘या’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

बारामती, 3 जानेवारीः राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असणारे अन्नधान्य 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत पात्र लाभार्थ्यांना मोफत वितरीत करण्याचा निर्णय केंद्र शासनाने जाहीर केला आहे. डिसेंबर 2022 चे धान्य घेतले नाही, अशा बारामती तालुक्यातील लाभार्थ्यांनी जानेवारी 2023 मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य मोफत प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन तहसिलदार विजय पाटील यांनी केले आहे.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना प्रशासनाकडून अभिवादन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम, 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 3 रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ, 2 रुपये दराने गहू आणि 1 रुपये प्रतिकिलो दराने भरडधान्य वितरीत करण्यात येते. तथापि, केंद्र शासनाने सदर अन्नधान्य सन 2023 मध्ये मोफत वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे, असे तहसिलदार पाटील यांनी कळवले आहे.

अजित पवारांच्या विरोधात बारामतीत भाजप आक्रमक

One Comment on “‘या’ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *