शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन

बारामती, 22 नोव्हेंबरः एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषि विकास योजना 2022-23 राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी महाडीबीटी- https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

बारामतीच्या विशेष जिल्हा सत्र न्यायालयाने ठोठावली 20 वर्षांची शिक्षा

या योजनेअंतर्गत सामुहिक शेततळे, शेडनेट हाऊस, पॉली हाऊस, प्लॅस्टिक मल्चिंग, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटीका व वैयक्तिक शेततळे अस्तरीकरणासाठी सर्व प्रवर्गातील इच्छुक शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.

सामुहिक शेततळ्यामुळे अवर्षण प्रवण भागातील शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत पाण्याचा साठा उपलब्ध होईल. संरक्षित शेती घटकांतर्गत शेडनेट हाऊसमध्ये काकडी, ढोबळी मिरची, संकरीत वागी तसेच पॉली हाऊसमध्ये सेलेरी, झुकीनी, रंगीत मिरची, फुलशेती व विदेशी भाजीपाला यांचे उत्पादन होऊन तर भाजीपाला रोपवाटिकाद्वारे उच्च दर्जाची व गुणवत्ताक्षम रोपांची निर्मीती होऊन शेतकऱ्यांना अधिकचा आर्थिक फायदा मिळण्यास मदत होईल.

रासपकडून फेरविचार याचिका दाखल करण्याची मागणी

अधिक माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी कळविले आहे.

One Comment on “शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *