सौर कृषी पंपासाठी 31 मे पर्यंत लाभार्थी हिस्सा जमा करण्याचे आवाहन

पुणे, 13 मेः राज्यातील महाकृषी अभियानाअंतर्गत प्रधानमंत्री कुसूम घटक-ब योजनेअंतर्गत सौर कृषी पंप आस्थापित करण्यासाठी महाऊर्जाच्या ई-पोर्टलवर अर्ज केलेल्या अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठीची अंतिम मुदत 31 मे 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

सौर कृषी पंप आस्थापित अर्जदारांना लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी एसएमएसद्वारे कळविण्यात आले आहे. लाभार्थी शेतकऱ्यांना ऑनलाईन किंवा धनाकर्षाद्वारे लाभार्थी हिस्सा भरावयाचा असल्यास ई-पोर्टलवर धनाकर्षाची (डिमांड ड्राफ्ट) प्रत अपलोड करुन नजीकच्या महाऊर्जाच्या कार्यालयात जमा करावा लागणार आहे.

पीएम- कुसुम योजनेअंतर्गत 50 हजार सौर कृषिपंप आस्थापित करण्याचे सद्यःस्थितीत उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. अहमदनगर, औरंगाबाद, बीड, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जळगांव, जालना, लातूर, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, पुणे, सोलापूर, वाशिम व यवतमाळ या जिल्ह्यातील उद्दीष्ट पूर्ण झाले असून अकोला, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, कोल्हापूर, नागपूर, पालघर, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, ठाणे व वर्धा या जिल्ह्यांमध्ये सौर कृषिपंप उपलब्ध असून लाभार्थ्यांनी https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर नोंदणी करावी.

सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांनी अनुसूचित जाती तसेच अनुसूचित जमातीच्या घटकांचा लाभार्थी म्हणून सौर कृषी पंपाची ई-पोर्टलवर चुकीचे जातीचे प्रमाणपत्र अपलोड करुन नोंद केल्यास त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. राज्यातील लाभार्थी शेतकऱ्यांसाठी ई- पोर्टलवर अर्ज करण्यास लाभार्थी हिस्सा भरण्यास व इतर अंमलबजावणी संदर्भात अडचणी असल्यास महाऊर्जाच्या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत सकाळी 9:45 ते सायंकाळी 6:15 वा. पर्यंत संपर्क साधावा.

योजनेबाबत अधिक माहितीसाठी 020-3535000456 या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच नागपूर विभागासाठी 9423113865 व 0712-2531602, अमरावती विभागासाठी 7030927337 व 0721-2661610, लातूर विभागासाठी 9511684703 व 02382-226680, औरंगाबाद विभागासाठी 7030927268 व 0240-265355,नाशिक विभागासाठी 7030927279 व 0253-2598685, मुंबई विभागासाठी 9021219479 व 022-22876436,कोल्हापूर विभागासाठी 7030927301 व 0231-2680009 या क्रमांकावर संपर्क साधावा. पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्हयातील शेतकऱ्यांनी याबाबत काही अडचण असल्यास 7030927255 तसेच 020-35000454 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *