बारामती, 5 ऑक्टोबरः बारामती शहरातील वीजपुरवठा उद्या, गुरुवारी 6 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. बारामती शहरातील वीजपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या कारणास्त बंद राहणार असल्याचे महावितरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. मात्र बारामतीमधील एमआयडीसी वीजपुरवठा सुरु राहणार आहे.
बारामती पोलिसांचे नागरीकांना आवाहन!
महावितरणला महापारेषण कंपनीच्या अति उच्च दाब वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा होतो. उद्या, गुरुवारी महापारेषणच्या एमआयडीसी 220/33 केव्ही अति उच्च दाब उपकेंद्रात काही अतिमहत्वाची दुरुस्ती कामे करण्यासाठी वीजपुरवठा बंद करावा लागणार आहे. त्यामुळे महापारेषणकडून महावितरणच्या बारामती शहर, बारामती टेक्सटाईल पार्क आणि बारामती एमआयडीसी नं. 1 उपकेंद्रातून निघणारी गणेश मंदिर व सूर्यनगरी वाहिनी प्रभावित होणार आहे. त्यामुळे या उपकेंद्र व त्यांच्या वाहिनीद्वारे पुरवठा केल्या जाणाऱ्या भागाचा वीजपुरवठा गुरुवारी सकाळी 9 ते दुपारी 1 यावेळेत बंद राहणार आहे.
सोमेश्वर कारखान्याचा गळीत हंगाम 9 ऑक्टोबरपासून सुरु
देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी महापारेषण व महावितरणचे नियोजन आहे. होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरण दिलगीर असून, नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.