बारामती तालुक्यात अमृत घरकूल मोहिमेत प्रधानमंत्री आणि रमाई आवास योजनेअंतर्गत सन 2020-2021 मध्ये सुरू असलेली एकूण 799 घरकुले अद्याप पूर्ण झालेली नाहीत. तसेच 402 घरकुले मंजूर होऊनही त्यांच्या कामाला सुरुवात झाली नाही. अशा अपूर्ण आणि विलंबित घरकुलांच्या लाभार्थ्यांना ‘पोस्टकार्ड आपले घरी’ या वैशिष्ट्यपुर्ण अभियानाद्वारे पोस्ट कार्यालय मार्फत पोस्टकार्डचे आवाहन संदेश आणि घरकुले मंजूर होवूनही सुरू न केलेल्या 402 विलंबित घरकुल लाभार्थ्यांना अनुदान वसुलीसाठी अथवा घरकुले पूर्ण करण्यासाठी लोक अदालतीच्या माध्यमातून नोटीस वाटप केले आहे.
घरकुल लाभार्थ्यांनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षात अमृत घरकुल मोहिमेत सहभागी व्हावे. तसेच शासनाच्या अनुदानाचा उपयोग करुन घरकुल वेळेत पुर्ण करावे आणि निवाऱ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामतीचे गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल यांनी केले आहे.