विभागीय माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीबाबत आवाहन

पुणे, 11 मेः विभागीय माहिती कार्यालयातील मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिके, साप्ताहिके व इतर किरकोळ जमा झालेली रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. तरी ज्यांना वृत्तपत्राची रद्दी घ्यावयाची आहे, त्यांनी आपली दरपत्रके 20 मे 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात द्यावीत.

लिफाफ्यावर ‘रद्दीसाठी दरपत्रके’ असा उल्लेख असावा. मुदतीनंतर आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार केला जाणार नाही, असे आवाहन उपसंचालक (माहिती), पुणे यांनी केले आहे.

तसेच रद्दी विक्रीबाबतची माहिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आलेली आहे. दरपत्रके पाठविण्यासाठी कार्यालयाचा पत्ता : उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, पुणे-411001 कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक : 020-26123435 असा आहे. वरील पत्त्यावर दरपत्रके पाठवावीत. ही दरपत्रके 24 मे 2022 रोजी दुपारी 3.00 वाजता उघडण्यात येतील. दरपत्रके स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हे कार्यालय राखून ठेवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *