मतदानाविषयी जनजागृती करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन

बारामती, 4 फेब्रुवारीः राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी प्रसारित केलेले ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ या गीताचे सर्व ठिकाणी व्यापक स्वरूपात प्रसारण करून युवकांमध्ये मतदान करण्याविषयी जनजागृती करावी, असे आवाहन बारामती विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले आहे.

भारत निवणूक आयोगामार्फत राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी ‘मैं भारत हूँ, हम भारत के मतदाता है’ हे गीत प्रक्षेपित करण्यात आले होते. मतदारांमध्ये मतदानाविषयी जनजागृतीच्या दृष्टीने या गीताची व्यापक प्रमाणात प्रसार आणि प्रसिद्धी होणे आवश्यक आहे.

विद्या प्रतिष्ठानमध्ये रक्तदान शिबीर संपन्न

त्यासाठी तालुकास्तरीय नामांकित व्यक्ती, तालुक्यातील निवडणूक विषयक कामकाज हाताळणारे अधिकारी, कर्मचारी, सर्व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, कामगार तलाठी, मंडल अधिकारी, निवडणूक साक्षरता मंडळ, मतदार जागृती मंच, कंपन्याचे व्यवस्थापक, शाळा, महाविद्यालये आदींनी हे गीत https://youtu.be/to324Jlljf8 या संकेस्थळावरून डाऊनलोड करून त्याचे आपल्या स्तरावर प्रसारण करावे.

हातगाडी धारकांना नगरपरिषदेचे आवाहन

प्रेक्षागृहात सिनेमा सुरू होण्यापूर्वी व मध्यातरांमध्ये हे गीत व्यावसायिक सामाजिक उत्तरदायित्वांतर्गत प्रसारण करण्यात यावे. स्थानिक केबलवरुन या गीताचे प्रसारण करण्यात यावे. तसेच निवडणूकविषयक सर्व कार्यक्रमांमध्ये सदर गीत प्रसारित करण्यात यावे. या गीतास लाईक व शेअर करून इतर सामाजिक माध्यमांद्वारेही त्याचा प्रसार करावा, असे आवाहनही प्रांताधिकारी कांबळे यांनी केले आहे.

One Comment on “मतदानाविषयी जनजागृती करण्याचे प्रांताधिकाऱ्यांचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *