बारामती, 18 ऑक्टोबरः बारामती शहरासह तालुक्यात आगामी दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे बारामतीकरांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कऱ्हा नदी पात्रात अचानकपणे पाणी वाढल्याने शहरातील काही रस्ते पाण्याखाली जात आहेत.
बानपकडून कऱ्हा नदीवर नागरीकांना आवाहन
या पुरातील पाण्यातून रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न काहीजणांकडून होताना दिसत आहे. नदीतील पाण्याचा वेग आणि प्रवाहाचा अंदाज येत नाही. त्यामुळे एखादी अनुचित प्रकार होऊन होण्याची शक्यता आहे. ऐन सणासुदींच्या काळात मोठं संकट उद्भवू शकते. त्यामुळे कोणीही पाण्याबाबत फाजील आत्मविश्वास बाळगू नये, असे आवाहन बारामती शहर पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
कऱ्हा नदीच्या पाणी पात्रात मोठी वाढ!
तसेच शहर पोलिसांकडून नगरपालिका, पोलीस, पोलीस पाटील यांच्या सूचना पाळण्यास सांगितले आहे. यासह सेल्फी काढणे किंवा पुराच्या कडेला उभे राहणे, दगडांवर उभे राहणे यासारख्या घटना टाळाव्यात, त्यामुळे अपघात होऊ शकतो, असे सांगितले आहे.
बारामती शहरातील लेंडी पट्टा, मळद ब्रिज, गुणवडी, खंडोबा नगर, या भागात नागरी वस्तीत पाणी घुसण्याची शक्यता आहे. यामुळे त्या भागातील लोकांनी पूर्वीची पूर पातळी लक्षात घेऊन अगोदरच आपापली घरे, दुकाने, व्यावसायिक ठिकाणी येथील मालमत्ता हलवावी. जर कोणाला मदत लागली तर तात्काळ पोलीस मदतीसाठी डायल 112 तात्काळ कॉल करा. दहा मिनिटांत मदत पोहचेल, असे शहर पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
One Comment on “पोलीस प्रशासनाचे बारामतीकरांना आवाहन”