वर्धापन दिनानिमित्त बारामती नगरपरिषदेचे आवाहन

बारामती, 31 डिसेंबरः बारामती नगरपरिषद ही 1 जानेवारी 2023 ला 158वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. या वर्धापन दिनानिमित्त बारामती नगर परिषदेने बारामतीकरांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच वर्धापन दिनाचे औचित्य साधून बारामती नगरपरिषदेने 1 जानेवारी 2023 रोजी सायंकाळी 5 वाजता नगरपरिषद प्रांगणात चहापान समारंभ आयोजित केला आहे.

राज्य ऑलिम्पिक कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रांताधिकाऱ्यांच्या सूचना

या वेळी नागरिकांना नगरपालिकेने शहरातून गोळा केलेल्या ओल्या कचऱ्यापासून निर्मित सेंद्रिय खत आणि तुळशीचे रोप भेट देण्यात येणार आहे. तसेच सदर कार्यक्रमास शहरातील नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही बानपच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांच्या दोन गटात फ्री स्टाईलने तुफान राडा

2 Comments on “वर्धापन दिनानिमित्त बारामती नगरपरिषदेचे आवाहन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *