बारामती, 27 ऑक्टोबरः बारामती कृषि उपविभागात रब्बी हंगामासाठी पंतप्रधान पिक विमा योजना बीड पॅटर्ननुसार (80: 110) राबविण्यात येत आहे. या योजनेत विमा कंपनीवर 110 टक्क्यांपर्यंत नुकसान भरपाईचे दायित्व असणार आहे. तसेच 110 टक्क्यांपेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देणार आहे. या पिक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन बारामती उप विभागीय कृषि अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
दिवाळीनिमित्त चक्क स्मशानभूमीत दिव्यांचा लखलखाट!
पंतप्रधान पिक विमा योजना ही अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी असेल. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्याना योजना ऐच्छिक आहे. खातेदार व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र असतील. या योजनेअंतर्गत सर्व पीकांसाठी 70 टक्के जोखीमस्तर निश्चित करण्यात आला आहे. रब्बी हंगामाकरीता रब्बी ज्वारी बागायत, रब्बी ज्वारी जिराईत, गहू बागायत, हरभरा, कांदा व उन्हाळी भूईमुग या पिकांचा समावेश केला आहे. सहभाग नोंदवण्याची अंतिम मुदत रब्बी ज्वारी साठी 30 नोव्हेंबर 2022, गहू बागायत, हरभरा व कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2022 तर उन्हाळी भुईमूगासाठी 31 मार्च 2023 अशी आहे.
‘मायेचा एक घास जवानांसाठी’ उपक्रमास शरद पवारांकडून हिरवा झेंडा
कर्जदार शेतकऱ्याने आपला 7/12 चा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड आणि पीक पेरणीचे स्वयंघोषणापत्र सादर करून प्राधिकृत बँकेत व बिगर कर्जदार शेतकऱ्याने कॉमन सर्व्हिस सेंटर, आपले सरकार किंवा महा ई-सेवा केंद्रात जाऊन पीक विमा भरावा. शेतकऱ्यांनी समाविष्ट पिकांची विमा संरक्षित रक्कम व विमा हप्ता दराच्या माहितीसाठी कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही तांबे यांनी केले आहे.
One Comment on “पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे कृषि विभागाचे आवाहन”