नियमबाह्य ऊस वाहतुकीमुळे असंख्य बळी!
जबाबदार कोण?
बारामती, 10 फेब्रुवारीः बारामती येथील उप प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर दिनांक 7 फेब्रुवारी 2023 पासून प्रबुद्ध युवक संघटनेकडून विविध मागण्यांकरीता आंदोलन सुरू आहे. त्यावर प्रबुद्ध युवक संघटनेकडून बारामतीमधील नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे.
आदरणीय सुज्ञ बंधू आणि भगिनींनो,
बारामती विकास होत असताना, बारामतीमध्ये उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बारामती-दौंड- इंदापूर या कार्यक्षेत्रासाठी निर्माण झाले. वाढते रस्ते अपघात व बेकायदेशीर नियमबाह्य वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण आणण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना पुण्याला जाण्यापेक्षा बारामतीमध्ये येणे सोयीचे व्हावे, म्हणून हे कार्यालय चालू करण्यात आले. परंतु या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात 12 कारखाने व असंख्य छोट्या-मोठ्या एमआयडीसीमधील कारखाने अधिकाऱ्यांच्या नाकाखाली बेकादेशीर नियमबाह्य वाहतूक व पार्किंग करत आहे. ओव्हर लोडिंग, बेशिस्त पार्किंग यामुळे आतापर्यंत असंख्य जीवित हानी झाली आहे. कारखाने याची जबाबदारी घेत नाही. पण असंख्य कुटुंब मात्र उद्ध्वस्त होत आहे.
प्रबुद्ध युवा संघटनेच्या आंदोलनाला विविध पक्षांचा जाहीर पाठिंबा
पाकीट संस्कृतीमुळे बारामती उपविभागात नियुक्ती भाव वधारलाय. बारामती मध्ये बदल्यांसाठी कोरोडोची चर्चा आहे. याची वसुली प्रत्येक अधिकारी आपल्या पद्धतीने करत असून टार्गेट पूर्ण केल्याचा खोटा अभिमानाने मिळवणारे अधिकारी कित्येक जीवाशी खेळत आहे. मानवी जीवन महत्त्वाचे आहे की टारगेट महत्वाचे आहे की आर्थिक सुबत्ता? हे समजण्या पलीकडचे आहे. रस्त्यावर बंद पडलेली ऊस ओव्हर लोडेड ट्रॅक्टर-ट्रकला धडकून मारणारे लोकांची जबाबदारी कोण घेणार? कित्येक ऊस तोड कामगार अपंग झालेत. गोरगरीब जगतोय जीवाशी आणि मलिदा खातोय अधिकारी! ठेकेदारांना टारगेटच्या नावाखाली हितसंबंधिताना संरक्षण देण्याचे काम अधिकारी करत आहेत आणि मलिदा कारखानदार व वाहतूकदार खात आहेत, हे चित्र केव्हा बदलणार?
बारामतीत पत्रकार हल्ला प्रकरणी कठोर कारवाईची मागणी
दुसरीकडे सीएनजीच्या नावाने बेकायदेशीर दुकान थाटली आहेत. हायड्रो टेस्ट यंत्र सामग्री नसणाऱ्या व्यावसायिक खुलेआम बेकायदेशीर व्यवसाय करत आहेत. यातून मोठा अपघात झाल्यास व जीवितहानी झाल्यास कोणास जबाबदार धरायचं? हे अधिकारी व व्यावसायिक मानवी मृत्यूस कारणीभूत ठरणार आहेत का? यामुळे सर्व सामान्य नागरिकांच्या जीविताशी खेळणाऱ्यांवर जाब विचारणे हे प्रत्येक बारामती- दौंड- इंदापूर आदींच्या नागरिकांचे कर्तव्य आहे.
One Comment on “आरटीओ कार्यालयासमोर सुरू असलेल्या आंदोलनकर्त्यांकडून आवाहन”