बारामती, 17 नोव्हेंबरः बारामती तालुक्यातील माळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आठवड्यातील प्रत्येक सोमवारी सर्व वयोगटातील लोकांची नेत्र तपासणी होणार आहे. याचा लाभ सर्वांनी घ्यावा, असे आवाहन ग्रामस्थांना आरोग्य सहाय्यक अजित आत्तार यांनी केले आहे.
पिसाळलेल्या कुत्र्याने घेतला 22 जणांना चावला
माजी जिल्हा परिषद सदस्य विक्रमसिंह राजेजाधवराव यांच्या प्रयत्नातून सुमारे साडेतीन कोटी रुपयांचे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारले आहे. गेली पावणेदोन वर्षांपासून हे केंद्र सुरू आहे. या केंद्रात दररोज ओपीडी, लसीकरण, रक्त तपासणी, सलाइन लावणे आदी कामे सुरू आहेत. वरिष्ठ पातळीवरून या केंद्रात दर सोमवारी नेत्र तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी नेत्रतज्ज्ञ डॉ. रामचंद्र मदने यांची नेमणूक केली आहे. पहिल्याच सोमवारी 30 जणांची नेत्र तपासणी केली आहे. ही नेत्र तपासणी माळेगाव बु, माळेगाव खुर्द, पाहुणेवाडी, धुमाळवाडी, शिवनगर, येळे वस्तीतील ग्रामस्थांसह माळेगाव कारखान्याच्या ऊसतोडणी मजुरांसाठी आहे.
बारामती उपविभागात 64 प्रकल्पांना मंजुरी
One Comment on “प्राथमिक आरोग्य केंद्रात नेत्र तपासणीसाठी आवाहन”