मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या

धाराशिव, 26 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणासाठी सध्या राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही दिवसांत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यामध्ये अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानंतर आता धाराशिव जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षण लागू करावे, या मागणीसाठी आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रवीण घोडके (36) असे या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने काल (दि.25) झाडाला गळफास लावून घेत स्वतःचे जीवन संपवले. तो भूम तालुक्यातील निपाणी या गावचा रहिवासी होता. पोलिसांना त्याच्या मृतदेहाच्या शेजारी सुसाईट नोट सापडली आहे. या चिठ्ठीत त्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे.

मोदी आज शिर्डीच्या दौऱ्यावर! अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करणार

तत्पूर्वी, प्रवीण हा शेतीचे काम करायचा. त्याचे लग्न झाले होते. त्याला 2 मुले आणि 1 मुलगी आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या मराठा आरक्षण आंदोलनात प्रवीण घोडके हा सहभागी होत असल्याचे ही सांगितले जात आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी 25 ऑक्टोंबरपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाच्या तरुणांनी आरक्षणासाठी आत्महत्या करु नये, असे आवाहन यावेळी जरांगे पाटलांनी केले आहे.

मनोज जरांगे यांना रोहित पवारांचा पाठिंबा, अन्नत्याग करणार!

“आत्महत्या केल्याने न्याय मिळणार नाही. उलट आपल्या समाजाचंच नुकसान होईल. त्यामुळे मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या करु नये. मला तुमची गरज आहे.” असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. तर याच्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मराठा समाजाच्या तरुणांनी आत्महत्या या न करण्याचे आवाहन केले आहे. “मराठा समाजातील तरुणांच्या आत्महत्यांच्या घटना या अतिशय दुर्दैवी आणि वेदनादायी आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मी मराठा समाजातील तरुणांना विनंती करतो की, आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका. आपल्या आई वडिलांचा आणि मुलाबाळांचा विचार करा.” असे मुख्यमंत्री म्हणाले होते.

One Comment on “मराठा आरक्षणासाठी आणखी एक आत्महत्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *