अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बारामती, 16 जानेवारीः (प्रतिनिधी- शरद भगत) बारामती तालुक्यातील पळशी येथील अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज येथे नुकताच वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या मध्ये नर्सरी ते बारावीतील विद्यार्थ्यानी सहभाग घेतला होता.

या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राची लोकगीते, आराध्य दैवत खंडोबा देवाची गाणी, हिंदी फ्युजन गाणी, ग्रुप डान्स, सोलो डान्स असे विविध प्रकारचे कलागुण विद्यार्थ्यांनी सादर केले. यासह पावनखिंड हुबेहुब सादरीकरण, विठ्ठल थीम व आर्मी थीम कार्यक्रमाने प्रेक्षकांचे डोळ्याचे पारणेच फेडले.

बारामतीमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची दुरवस्था

तसेच या वर्षी झालेल्या मैदानी स्पर्धेचे विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब करे, पळशी गावचे सरपंच ताई काळे, सामाजिक कार्यकर्ते माणिक काळे, सागर वाबळे, पोपट तावरे, लोणी भापकरचे माजी सरपंच रविंद्र भापकर, पंचायत समिती सदस्य राहुल भापकर, राष्ट्रवादीचे तालुका उपाध्यक्ष तानाजी कोळेकर, सायांबाच्या वाडीचे सरपंच हनुमंत भगत, जय मल्हार क्रांती संघटनेचे नानासाहेब मदने यासह सामाजिक-राजकीय संस्थांचे आजी माजी पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे कोरिओग्राफी आकाश सोनवणे यांनी केले. सूत्रसंचलन बी. जे. पडवळ, आकाश वाघमारे यांनी तर आभार प्राचार्य सुनील जानकर यांनी मानले.

बारामतीत मोटरसायकल चोरांची टोळी गजाआड

One Comment on “अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *