अण्णाभाऊ साठे यांचं समाजप्रतीचे योगदान महत्त्वाचे!

पुरंदर, 16 ऑगस्टः (प्रतिनिधी- शरद भगत) पुरंदर तालुक्यातील पुर्व भागातील नायगाव येथे नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रतिमेला पुष्पहार घालून मिरवणुक काढून आणि त्यांच्या स्मृतिस अभिवादन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

चोपडजमधील कथित भ्रष्टाचार विरोधात पुण्यात आंदोलन

यावेळी व्याख्याते सागर चव्हाण यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी बोलताना सागर चव्हाण म्हणाले, ‘अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगाव सांगली गावच्या वाटेगाव या खेड्यात मातंग समाजातील एका कुटुंबात झाला. औपचारिक शिक्षणाचा अभाव असुन देखिल अण्णाभाऊ साठे यांनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या, अनेक लेख लिहिले.

पेट्रोल पंप लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक

तसेच अण्णाभाऊ साठे हे एक समाजसुधारक आणि लेखक होते. फकिरा या कादंबरीला 1961 मध्ये राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. अण्णाभाऊ साठे यांचे 15 लघुकथांचे संग्रह आहेत. समाजसेवकांच्या जीवनातील अनेक विविध पैलूंना त्यानी उजाळा दिला, असे ही चव्हाणांनी आपल्या व्याख्यानातून म्हटले आहे.

One Comment on “अण्णाभाऊ साठे यांचं समाजप्रतीचे योगदान महत्त्वाचे!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *