बारामती, 1 ऑगस्टः बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज, 1 ऑगस्ट 2022 रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमईएस हायस्कूलचे प्राचार्य शिवराम सोनवणे सर आणि आरपीआय (आ) चे बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन अरविंद जगताप यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सूचनेनुसार करण्यात आले.
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गोर गरीबांना अन्नदान
या कार्यक्रमाला हौसेराव कोकरे, सूर्यकांत मोरे, बाळासो देवकाते, संतोष मोकाशी, सुरज माळशिकारे, ऋषिकेश टेंगले, शरद भोसले, ऋषिकेश इंगवले, अक्षय कुरले, लक्ष्मण पाथरकर, नितीन आढाव, दादा कोकरे, सुरेखा कुरले, धनंजय चव्हाण, नितीन भिसे, विजय शिंदे, यासह कृषी उत्पन्न बाजार समिती बारामतीचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related