साहित्यरत्न डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त बारामतीत अन्नदान सेवा उपक्रम

बारामती, 01 ऑगस्ट: (अभिजित कांबळे) साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्याला मानवंदना देण्यासाठी अन्नदान सेवा उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सामाजिक उपक्रम बारामती शहरातील प्रबुद्धनगर येथे दिनांक 2 ऑगस्ट 2025 रोजी, शनिवार दुपारी 12.30 वाजता पार पडणार आहे.



लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर वंचित, श्रमिक आणि शोषित घटकांच्या हक्कांसाठी लढा दिला. त्यांच्या संघर्षमय कार्यातून प्रेरणा घेत, बारामतीतील तरुणांनी हा उपक्रम पुढाकाराने उचलला आहे. या अन्नदान सेवेमुळे गरजूंपर्यंत थेट मदत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



या कार्यक्रमाच्या आयोजनात गणेश (झुंजार) मागाडे, युवराज गायकवाड, अर्पित (भैया) मोहित, सुरज गायकवाड, नितीन (बाबा) मोहिते, सचिन मोरे, रवींद्र (पप्पू) सोनवणे, संदेश मगाडे यांचा विशेष सहभाग असून, आयोजनाच्या प्रत्येक टप्प्यात त्यांनी जबाबदारीने काम पाहिले आहे.



या उपक्रमासाठी परिसरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते, युवक व नागरिकांचे सक्रिय सहकार्य लाभले आहे. कार्यक्रमावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती अपेक्षित आहे. बारामतीतील आमराई येथील GM ग्रुप ओन्ली 700 बॉईज या युवा गटाने या अन्नदान उपक्रमाचे आयोजन करून सामाजिक जाणिवेचा भक्कम संदेश दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *