पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अनिल देशमुखांचा गंभीर आरोप

पुणे, 13 जून: (विश्वजीत खाटमोडे) राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी गंभीर आरोप केला आहे. या अपघातात दुचाकीवरील तरूण तरूणीचा मृत्यू झाला होता. तर या अपघातावेळी हे मृत तरूण-तरूणी दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याचा सिद्ध करण्याचा प्रयत्न केला जातोय, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे. यासंदर्भात अनिल देशमुख यांनी ट्विट केले आहे.

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1801089922008326410?s=19

https://twitter.com/AnilDeshmukhNCP/status/1801089925191999972?s=19

अनिल देशमुख काय म्हणाले?

“पुणे हिट ॲन्ड रन प्रकरणामध्ये राजकीय दबावाखाली आरोपीचे रक्ताचे नमुने बदलून आरोपी दारू न पिल्याचा अहवाल तयार करण्याचे प्रयत्न झाले, हे उघड झाले आहे. आता माजी गृहमंत्री म्हणुन माझी माहिती अशी आहे की, मृतकांच्या Viscera Report मध्ये Alcohol +ve यावे याकरिता पूर्णपणे तयारी झाली आहे. जेणेकरून या प्रकरणामध्ये मृत झालेले मोटरसायकल वरील तरूण तरूणी हे दारु पिऊन होते आणि त्यांच्यामुळेच हा अपघात झाला, असे न्यायालयात सिद्ध करता येईल. जेणेकरून विशाल अग्रवालचा मुलगा लवकर सुटेल, अशा पद्धतीने प्रयत्न सध्या सुरू आहेत,” असे अनिल देशमुख यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, पुण्यातील कल्याणी नगर परिसरात 19 मे रोजी हा अपघात झाला होता. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणातील आरोपी हा अल्पवयीन असल्याने त्याला बाल सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. या अपघातावेळी हा आरोपी दारूच्या नशेत कार चालवत होता. तर या आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात दारूचा अंश सापडू नये, यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने बदलण्यात आले होते. या प्रकरणात सदर अल्पवयीन आरोपीच्या आई वडीलासह ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे. तर या अपघात प्रकरणी आरोपीच्या आजोबासह इतर काही जणांना अटक करण्यात आली आहे. सध्या या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *