अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार

लाडकी बहीण योजना 2100 हप्ता

मुंबई, 13 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रातील नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना 2023-24 या आर्थिक वर्षासाठी 3 कोटी रुपये इतकी भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे. याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आतापर्यंतच्या कालावधीत प्रथमच विशेष बाब म्हणून नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना भाऊबीज भेट रक्कम मंजूर करण्यात आली आहे.

फटाक्यांमुळे मुंबईतील प्रदूषणात आणखी वाढ

तर अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना राज्य सरकारच्या वतीने यापूर्वीच 37 कोटी 33 लाख रुपये भाऊबीज भेट म्हणून जाहीर करण्यात आले होते. तसेच आता नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना देखील राज्य सरकारकडून 3 कोटी रुपयांची भाऊबीज जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण 40 कोटी 33 लाख रुपयांचा निधी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून वितरीत करण्यात आला आहे.

शरद पवारांच्या कथित जात प्रमाणपत्रावर सुप्रिया सुळेंचे स्पष्टीकरण

त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांना ही रक्कम लवकरात लवकर मिळावी, यासंदर्भातील आदेश महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका यांची यंदाची दिवाळी गोड होणार आहे.

One Comment on “अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड होणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *