बारामती, 24 जुलैः बारामती शहरातील कसबा येथील आगवणे गल्लीमधील एका लिंबाच्या झाडावर 18 जुलै 2023 रोजी सकाळच्या सुमारास एक घुबड हवेत उलटे तरंगताना तेथील स्थानिकांना दिसले. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी त्या घुबडाची धडपड सुरु असल्याचे दिसत होते. व्यवस्थित पाहिले असता सदर घुबड हे चायना मांजामध्ये अडकल्याचे दिसले.
शासन आपल्या दारी योजना फक्त कागदावरच?
सदर घटनेबद्दल सुलभा आगवणे यांनी सिद्धार्थ आगवणे आणि संजय मोरे यांना सांगितले. त्या घुबडची सुटका करण्यासाठी सिद्धार्थ आगवणे हे चढले. घुबडाच्या आवती भोवती असणारा चायना मांजा सिद्धार्थ यांनी तोडला आणि त्याला खाली आणले. मात्र शरीरावर जखमा झाल्याने घुबडला उडता आले नाही. यामुळे तेथील स्थानिकांनी प्राणीमित्र बबलू कांबळे व त्यांच्या टिमला पाचारण केले.
इंदु स्कुलची श्रेया काळाणे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम
प्राणीप्रेमींनी सदर पक्षी ताब्यात घेतले असून घुबडवर उपचार करण्यात येत असल्याची माहिती सांगण्यात आली आहे. या घटनेनंतर घुबडाला जीवनदान दिल्यामुळे सिद्धार्थ यांचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.
One Comment on “चायना मांजामध्ये अडकलेल्या घुबडला दिले जीवदान”