मद्यपी पोलिसाचा ऑनड्युटी राडा; गुन्हा दाखल

दौंड, 18 ऑगस्टः दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलातील (एसआरपीएफ) पोलीस नाईकाविरूध्द ऑनड्युटी मद्यपान करून गोंधळ घातला. याप्रकरणी संबंधित पोलिसावर गुन्हा दाखल केला आहे.

बिग ब्रेकिंग बारामतीत कुऱ्हाडीने सपासप वार करत एकाची हत्या!

दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून, एसआरपीएफ गट क्रमांक 7 मधील पोलिस नाईक सोमनाथ पंढरीनाथ रायकर (रा. 565 क्वार्टर, गट क्रमांक 7, दौंड) याने मद्यपान करून आज, 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7.15 च्या सुमारास मैदानावर येऊन गोंधळ घातला होता. ही बाब गटाचे समादेशक वसंत परदेशी यांनी गंभीरतेने घेत कारवाईचे निर्देश दिले. दौंड पोलिस ठाण्यात एसआरपीएफचे फौजदार वैभव टेकवडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार रायकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

बारामतीत 900 हेक्टर जमीन घोटाळा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *