पिंपरी चिंचवड परिसरात महिला अत्याचाराची घटना; महिला आयोगाने घेतली दखल

वाकड, 17 मे: (विश्वजीत खाटमोडे) पिंपरी चिंचवड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस मारहाण करून तिच्या शरीरावर ब्लेडने वार केल्याची घटना घडली आहे. तसेच त्याने स्वतःच्या पत्नीवर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही संतापजनक घटना ताथवडे परिसरात घडली. याप्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याच्या विरोधात गुन्ह्याची नोंद झाली आहे. आता या प्रकरणाची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिसांना या घटनेची योग्य ती चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या संदर्भात वाकड पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना त्यांनी पत्र लिहिले आहे.

https://twitter.com/ChakankarSpeaks/status/1791435992970265044?s=19

आरोपीला अटक

पिंपरी चिंचवडमध्ये चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीस मारहाण करून अत्यंत विकृत कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. महिलेवर केलेल्या शारीरिक अत्याचाराचे स्वरूप अतिशय क्रूर आणि संतापजनक आहे. याप्रकरणी वाकड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेत तातडीने पीडितेला योग्य ते उपचार देण्याचे तसेच तपास जलद पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर प्रकरणाची योग्य ती नियमानुसार चौकशी करून कार्यवाही करावी व आपण केलेल्या कार्यवाहीचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाला पाठवावा, असे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी या पत्रात म्हटले आहे.

ताथवडे परिसरातील घटना

पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरात ही विकृत मानसिकतेचा कळस गाठणारी घटना घडली आहे. पोलिसांनी पतीविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. सध्या वाकड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र हादरून गेला आहे. पीडित महिलेवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर आरोपीला कडक शिक्षा करण्याची मागणी समाज माध्यमातून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *